कृषि यांत्रिकीकरणची लाभार्थी निवड यादी आली. mahadbt list 2025

mahadbt list 2025 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! कृषी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंत्रसामग्री आणि अवजारांसाठीची दुसरी सोडत जाहीर झाली आहे. या सोडतीमध्ये राज्यातील एकूण ४० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची निवड झाली आहे.

महाडीबीटी लॉटरी यादी (MahaDBT Lottery List)

ही लॉटरी पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाइन असून, यामुळे गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेणे सोपे झाले आहे. ज्या शेतकऱ्यांची या यादीत निवड झाली आहे, त्यांना पुढील सात दिवसांच्या आत महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

हे पण वाचा:
अतीव्रुष्टी नुकसानभरपाई, हेक्टरी एवढी मदत मिळनार.. ndrf nuksan bharpai

यादी कशी पाहावी?

तुमचं नाव लॉटरी यादीमध्ये आहे का, हे तपासण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:

  1. सर्वात आधी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलला भेट द्या.
  2. होम पेजवर ‘शेतकरी योजना’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर ‘निधी वितरित लाभार्थी यादी’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  4. पुढील पेजवर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  5. ही माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी येईल. या यादीत तुम्ही तुमचं नाव पाहू शकता आणि पुढील प्रक्रिया करू शकता.

निवड झालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या

या सोडतीत जवळपास ४४,१५१ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • अहमदनगर: २,६८३
  • अकोला: १,५३६
  • अमरावती: १,३३१
  • छत्रपती संभाजीनगर: १,३९४
  • बीड: २,३११
  • भंडारा: ३५७
  • बुलढाणा: ३,०७७
  • चंद्रपूर: ७७८
  • धुळे: १,२४४
  • गडचिरोली: १५०
  • गोंदिया: ४६१
  • हिंगोली: १,३१३
  • जळगाव: २,०२९
  • जालना: १,७७४
  • कोल्हापूर: ७८३
  • लातूर: २,९८९
  • नांदेड: ३४१
  • नागपूर: ७५०
  • नाशिक: १,४१८
  • नंदुरबार: (आकडेवारी उपलब्ध नाही)
  • धाराशिव: १,७३८
  • परभणी: ३,०३०
  • पालघर: २०
  • पुणे: १,५३८
  • रायगड: १६
  • रत्नागिरी: २२
  • सांगली: १,०५९
  • सिंधुदुर्ग: २९२
  • सोलापूर: २,१३१
  • ठाणे:
  • वर्धा: १,०४६
  • वाशिम: १,१७०
  • यवतमाळ: १,७३४

या लॉटरीमध्ये निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन! पोर्टलवर लवकरात लवकर कागदपत्रे अपलोड करून या योजनेचा लाभ घ्या.

हे पण वाचा:
Aditi Tatkare: लाडकी बहीण योजनेच्या सुमारे २६ लाख लाभार्थ्यांची पात्रता तपासणी.

Leave a Comment