Diwali anudan : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीची मोठी खुशखबर आहे. राज्य सरकारच्या वतीने दिले जाणारे ५००० रुपये दिवाळी अनुदान (दुष्काळ मदत) आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याबाबत संदेश मिळू लागले आहेत.
कुठे सुरू झाले वितरण?
सध्या उपलब्ध माहितीनुसार पर्भणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना दुपारी १:१० वाजता ५००० रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे. याशिवाय धाराशिव, बुलढाणा, जालना आणि बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे पोहोचले असल्याचे समोर आले आहे. इतर जिल्ह्यांमध्येही आज संध्याकाळपर्यंत आणि येत्या दोन-तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात वितरण होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून गुरुवारपूर्वी सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना हे अनुदान पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक जिल्हाधिकारी स्वतः या प्रक्रियेची पाहणी करत असून, बँकांद्वारे डीबीटी पद्धतीने पैसे पाठवले जात आहेत.
कोणाला मिळणार लाभ?
- ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत
- ज्यांचे पीक नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे
- नोंदणीकृत शेतकरी (कुटुंब मर्यादा नाही, म्हणजे एका कुटुंबातील अनेक शेतकऱ्यांनाही लाभ मिळू शकतो)
पैसे थेट आधार कार्डाशी जोडलेल्या बँक खात्यात जमा होतात. म्हणून आपले आधार-लिंक्ड खाते तपासा. आज, उद्या किंवा परवा मेसेज येण्याची शक्यता आहे. पैसे न आल्यास घाबरण्याची गरज नाही, कारण वितरण टप्प्याटप्प्याने चालू आहे.
महत्वाच्या सूचना
- आपल्या आधार कार्डाशी जोडलेले बँक खाते सक्रिय आहे का ते तपासा
- पंचनामा आणि पात्रतेची कागदपत्रे व्यवस्थित आहेत याची खात्री करा
- जिल्हावार अपडेट्स लवकरच येतील
