दिवाळी अनुदान 5000 रुपये; कुठे सुरू झाले वितरण? जिल्हानिहाय अपडेट आणि महत्त्वाची माहिती diwali anudan 2026

diwali anudan 2026 : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या आधी सरकारकडून जाहीर झालेले ५००० रुपये अनुदान आता खात्यात जमा होऊ लागले आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार असून एकूण रक्कम सुमारे साडेसात हजार कोटी रुपये इतकी आहे. वितरण टप्प्याटप्प्याने होत आहे जेणेकरून सिस्टिमवर जास्त भार पडू नये आणि तांत्रिक अडचणी टाळता येतील.

पैसे कुठे जमा झाले आहेत?

२ नोव्हेंबर २०२६ रोजी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० रुपये जमा झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा विविध बँकांमधून DBT मार्फत हे पैसे जमा झाल्याचे SMS मिळाले आहेत. बुलढाणा, परभणी, धाराशिव, बीड, जालना या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी स्क्रीनशॉट पाठवून पैसे मिळाल्याची पुष्टी केली आहे. अकोला, अहमदनगर (कोपरगाव, जाफराबाद), सांगली या भागांतही काही शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याचे समजते.

जालना, बुलढाणा, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये तुलनेने जास्त वितरण झाले आहे. मात्र कोणत्याही जिल्ह्यात १०० टक्के वितरण झालेले नाही. लॉट पद्धतीने पैसे पाठवले जात असल्याने एकाच गावात काही जणांना मिळाले तर काहींना अजून मिळालेले नाहीत, हे नैसर्गिक आहे.

हे पण वाचा:
Diwali anudan दिवाळी अनुदान 5000 रुपये; शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, तुमच्या जिल्ह्यात कधी? Diwali anudan

आज (३ नोव्हेंबर) सातारा, पुणे, जळगाव, नागपूर, ठाणे यासह इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. मुख्यमंत्री यांनी गुरुवारपर्यंत वितरण पूर्ण होईल असे सांगितले असले तरी माहितीनुसार शुक्रवारपर्यंत प्रक्रिया सुरू राहू शकते.

कोणाला मिळणार हे ५००० रुपये?

  • ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे आणि पंचनाम्यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान दाखवले आहे, अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत.
  • फॅमिली लिमिट नाही. एका कुटुंबातील अनेक शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे पैसे मिळू शकतात.
  • पैसे थेट आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यात DBT मार्फत जमा होत आहेत. पंचनाम्यात दिलेले खाते नव्हे तर आधार-लिंक्ड खाते तपासावे.
  • नमो शेतकरी महाअभियानशी संबंधित हे अनुदान आहे. पीएम किसानशी थेट संबंध नाही.
  • ज्या शेतकऱ्यांकडे फॉरेस्ट लँड आहे आणि फार्मर आयडी नाही, त्यांना नंतर ई-केवायसी करावी लागू शकते. इतरांसाठी सध्या ई-केवायसीची गरज नाही.
  • सामाईक क्षेत्र असल्यास संबंधित शेअर होल्डर्सची संमतीपत्रे लागू शकतात. याबाबत यादी जाहीर झाल्यानंतर प्रक्रिया स्पष्ट होईल.

महत्त्वाचे: हे अनुदान नेमके ५००० रुपयेच आहे. कमी किंवा जास्त रक्कम आली असेल तर ती इतर कोणतीही रक्कम असू शकते, दुष्काळ अनुदान नव्हे.

काय करावे?

जर अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका. वितरण चार दिवस (मंगळवार ते शुक्रवार) सुरू राहण्याची शक्यता आहे. आधारशी लिंक असलेले खाते ऑनलाइन तपासा. एकापेक्षा जास्त खाती असल्यास सर्व तपासा. पंचनामा आणि पात्रता निकष पूर्ण असल्यास पैसे नक्की येतील.

हे पण वाचा:
Gold-Silver Rate सोनं-चांदी खरेदीदारांना मोठा दिलासा! आजच्या भावात नरमाई, पाहा २ नोव्हेंबर चे ताजे दर Gold-Silver Rate

Leave a Comment